करोना संक्रमणाच्या काळात प्रशासनाशी गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी – चंदगड मुस्लिम समाजाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2020

करोना संक्रमणाच्या काळात प्रशासनाशी गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी – चंदगड मुस्लिम समाजाची मागणी

करोना संक्रमण काळात प्रशासनाशी गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिसांना देताना अंजुमन ए इस्लाम चॅरीटेबल ट्रस्टचे तजमुल फनीबंद व सहकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
देशात अनेक ठिकाणी काही समाजकंटकी लोकांच्याकडून करोना विषाणुबाबत सरकारी नियम पाळले जात आहेत. सोशल मिडीयावर गैरवर्तनाचे व्हीडीओ येत आहेत. करोनामुळे देशात आणीबाणी असून एकोप्याचे दर्शन घडत आहे. अशा परिस्थितीमध्ये गैरवर्तन करुन सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या समाज कंटकावर कडक कारवाई करावी. अशा मागणी अंजुमन ए चॅरीटेबल ट्रस्ट व चंदगड तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांना दिले आहे. 
करोनामुळे भयंकर स्थिती असताना अशा संकटाच्यावेळी सोशल मीडियावर, टेलीव्हिजन माध्यमातून, मुस्लिम समाजातील काही तरुण मास्कचा वापर न करता बेदरकारपणे रस्त्यावर फिरत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर खोकत, शिंकत फिरत आहेत. काही ठिकाणी फळ विक्रेते थुंकी लावून पुरवत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी करोना संशयित रुग्ण डॉक्टर्स, नर्स व कर्मचाऱ्यांची अश्लील वर्तन करत आहेत. स्वतःच्या घरच्यांची परवा न करता अहोरात्र सेवा करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दगडफेक व मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच दिल्ली निजामुद्दीन आलेल्या करोना बाधित व संशयित यांचेकडून प्रशासनाशी गैरवर्तन होत असून अशा वेळी करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व कृत्यामुळे काही समाज कंटकांकडून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा सर्व कृत्यांचा चंदगड तालुका मुस्लिम समाजाकडून आम्ही निषेध करतो. अशी कृत्ये करणाऱ्यांवर  कडक कारवाई करावी अशी मागणी अंजुमन ए इस्लाम चॅरीटेबल ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने चंदगड पोलिस निरिक्षक यांच्याकडे केली आहे. निवेदनावर तजमुल फनीबंद, सलाऊद्दीन नाईकवाडी, रियाज मदार, अझरोद्दिन नाईक, इम्रान मुल्ला, आदिल अन्सारी, अल्लाऊद्दीन सय्यद, हिदायत नाईक, मुस्ताक अत्तार, अल्ताफ मदार, गौस मदार, आरिफ खेडेकर, वसीम नाईक, शब्बीर बेपारी, शकील नेसरीकर, रमीज पटेल, इक्बाल नाईक, असलम नाईक, झाकीर नाईक यांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment