चंदगड येथे शिवभोजनालयासाठी गुरुवारपर्यंत अर्ज करण्याचे तहसिलदार यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2020

चंदगड येथे शिवभोजनालयासाठी गुरुवारपर्यंत अर्ज करण्याचे तहसिलदार यांचे आवाहन


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यामध्ये शिवभोजनालय चालू करायचे आहे. यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ, एनजीओ, महिला बचतगट, भोजनालय रेस्टरंट व मेस यांनी शिवभोजनालयाच्या परवान्यासाठी विहीत नमन्यात योग्य कागदपत्रानुसार अर्ज करावेत. यासाठी तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे 9 एप्रिल 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असे आवाहन तहसिलदार विनोद रणवरे यांनी केले आहे. 
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिव भोजन‌ उपलब्ध करून देण्याच्या जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या आणि सद्यस्थितीत ज्या भोजनालयांतर सदर योजना 26 जानेवारी 2020 पासून तिमाही कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी याचे प्रयोजन आहे. यानुसार महानगर पालिकास्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे सूचित केले आहे. इच्छुकांनी अधिक माहीतीसाठी तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

आवश्यक कागदपत्रे – अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडील परवान्याची छायांकित प्रत, कामगार आयुक्त यांच्याकडील परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसायाचे ठिकाण बाजार समिती कार्यक्षेत्रातील असल्याचे त्यांचे संमतीपत्र, जागा मालकीचा पुरावा किंवा भाडे करार पत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

No comments:

Post a Comment