तेऊरवाडी ग्रामपंचायतीला औषध फवारणी पंप देताना एम .ए. पाटील, सोबत सरपंच सुगंधा कुंभार. |
ग्रामपंचायत तेऊरवाडीला औषध फवारानी करण्याचा विद्युत पंप येथील माध्यमिक शिक्षक एम. ए. पाटील यांनी मदत स्वरुपात दिला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी औषध फवारणी करावी लागत आहे . तेऊरवाडी ग्रामपंचायतीनेही यापूर्वी दोन वेळा गावामध्ये औषध फवारणी केली. पण पुरेसे औषध फवारणी पंप उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. बाहेर गावातून ट्रॅक्टर औषध फवारणी पंप मागवायचा तर जवळपास ७ हजार रुपये भाडे दयावे लागत होते. या पंपाची गरज ओळखून माध्यमिक विद्यालय तेऊरवाडीचे अध्यापक एम. ए. पाटील यानी ग्रामपंचायतीला औषध फवारणी पंप देणगी म्हणून सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार, उपसरपंच सौ. शालन पाटील, ग्रामसेविका सुनिता कुंभार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भिंगुडे, सुनिल पाटील, बजरंग पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संगीता पाटील, शेवंता पाटील, निर्मला कांबळे, पुंडलिक लोहार ग्रामपंचायत कर्मचारी परसू पाटील, नरसू कांबळे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment