करंजगाव (ता. चंदगड) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पात मगरीचा वावर असल्याची पाहणी करताना पाटणे विभागाचे वनक्षेत्रपाल डी. एस. पाटील व सहकारी. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
करजंगाव (ता. चंदगड) गावाजवळील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यात मगरीचे दर्शन झाल्याने या परिसरातील वावर असलेल्या नागरीकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच पाटणे येथील वनक्षेत्रपाल डी. एस. पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन तेथे परिस्थितीचा आढावा घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना खबरदारीचा घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
चंदगड तालुक्यात पाण्याचा साठा वाढविण्यासाठी बऱ्याच लहान मोठ्या प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी या करंजगाव गावाजवळ लघुपाटबंधारे प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. सध्या धरणात मुबलक पाणी साठा आहे. त्यामुळे तेथील शेतकरी वर्गाला शेतीसाठी पुरेसे पाणी मिळते. धरणाला विद्युत मोटारी जोडल्यामुळे तसेच गुराणां धुण्यासाठी शेतकऱ्यांची धरण परीसरात सतत वर्दळ असते. पण गेल्या चार दिवसांपूर्वी अचानक मगरीचे दर्शन झाल्यामुळे घबराहटीच वातावरण आहे. सकाळच्या वेळेस मगर पाण्याबाहेर येऊन उन्हात पडलेली बऱ्याच शेतकऱ्यांनी पाहिली आहे. ज्या ठिकाणी मगर आली आहे. त्या ठिकाणी मगरीच्या पायाचे तसेच शेपटीच्या खुणा दिसत आहेत. त्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन वनक्षेत्रपाल श्री. पाटील यांनी मगरीचा प्रकल्पामध्ये वावर असल्याचे सांगितले.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री. पाटील म्हणाले, "या सर्व गोष्टी पाहता मगरीचा वावर या प्रकल्पात आहे. पण ह्या प्रकल्पाला साधा एक ओढा सुद्धा जोडलेला नसतानाही मगर आली कोठुन हा मोठा प्रश्न आहे. येथील सर्व परीस्थिती आमच्या वरीष्ठांना कळवली आहे. 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी नदी काठावरील पाणी सर्वत्र पसरले गेले. त्यावेळी या प्रकल्पाला नदीचे पाणी येऊन मिळाले होते. त्यावेळीही मगर प्रकल्पात आली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. या प्रकल्पा शेजारील नागरीकांनी प्रकल्प परिसरात जास्त वर्दळ करु नये, खबरदारी घ्यावी असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment