प्रा.डॉ.बी.एस. पाटील |
कोवाड / प्रतिनिधी
संपूर्ण जगाला कोरोणा या रोगाने ग्रासले आहे.देशामध्ये महाराष्ट्र राज्य कोरोणा या रोगाचा केंद्रबिंदू ठरतो की काय अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच संभाव्य धोका लक्षात घेऊन भविष्यात होणारा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरातील सर्व शाळा,महाविद्यालये ही बंद करण्याचा निर्णय हा त्या त्या राज्यसरकार नी याआधीच घेऊन सर्व शाळा तसेच महाविद्यालये बंद करुन शैक्षणिक सालात होणाऱ्या परीक्षा सुध्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोणाबाबत घेतलेली धास्ती, त्यात परीक्षेची भीती,अभ्यासाचा ताण यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यावर याचा सरळसरळ परिणाम होऊन त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण होण्याचा धोका आहे.अश्या सर्व परिस्थितीत यु जी सी,नवी दिल्ली,उच्च शिक्षण संचालनालय ,महाराष्ट्र राज्य आणि शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांच्या निर्देशानुसार सर्व महविद्यालयीन विद्यार्थ्यानी आपले स्वास्थ उत्तम राहण्यासाठी काही अडचणी उदभवल्यास मानसोपचार आणि संमोहन उपचार घेण्यासंदर्भात आवाहन केले आहे.त्यामुळे कला,वाणिज्य,आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड चे मानस शास्त्र विभागाचे प्रा.डॉ.बी.एस. पाटील यांनी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्याना आवाहन केले आहे की कुणा विद्यार्थ्याला जर कोणत्याही प्रकारची भीती,ताणतणाव,समस्या,अस्व स्थता,चिंता,काळजी,मानसिक समस्या उदभवल्यास त्यांच्याशी 8971713131 या क्रमांकावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क करावे, प्रा.डॉ.बी.एस. पाटील हे गेली बरीच वर्षे माणसतज्ञ व समुपदेशक म्हणून काम करत आहेत,तरी विद्यार्थ्यानी वेळीच काही समस्या उदभवल्यास संपर्क करावे आणि तणावमुक्त जीवनाच्या दिशेने वाटचाल करावी,असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment