कोवाड व्यापारी संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत, जपली सामाजिक बांधिलकी - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2020

कोवाड व्यापारी संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत, जपली सामाजिक बांधिलकी


संजय पाटील - कोवाड / प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भावाने  रुग्णांच्या संख्येत  दिवसेंदिवस वाढ होत आहे.संपूर्ण देशभरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला,संपूर्ण देश कोरोणाशी लढताना दिसत आहे.अशा परिस्थितीत चंदगड तालुक्यातील कोवाड येथील पूर्ण बाजारपेठेतील व्यापार्यानी  जनता संचारबंदीत 18 दिवस सर्व व्यवहार बंद ठेऊन  देशहित जपले आहे, गेल्यावर्षी ऑगष्ठ महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूरामूळे येथील संपूर्ण बाजारपेठ उध्वस्त झाली होती,सध्या दुसऱ्यादा कोवाड बाजारपेठ ठप्प झालेली आहे.  महिन्यांच्या धक्क्यातून कोवाडचे व्यापारी  सावरतात न सावरतात तोवर कोरोणा चे संकट  आले,अश्या परिस्थितीतही खचून न जाता येथील व्यापारी वर्ग हा उभा आहे.कोणाचं घर पडलं...कुणाचं छप्पर फाटलं....कोणाची भिंत खचली... अश्या अनेक प्रसंगात येथील व्यापार्यानी एकमेकाना  मदतीच्या हात पुढे केला.सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संचार बंदी असल्यामुळे रोजंदारीवर असलेल्या अनेक लोकांच्यासमोर दररोजच्या गरजा भागविण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.या लोकांना मदत मिळावी या उद्देशाने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत  आपली सर्व दुःख,अडचणी बाजूला ठेऊन  व्यापारी वर्गाने वैयक्तिक तसेच संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे आट्टा 2 किलो ,तांदूळ 1 किलो,साखर 1 किलो,चहा पूड 100 ग्रॅम, हरभरा डाळ आणि मीठ अर्ध्या किलो,बिस्कीट पुडा, साबण,टूथपेस्ट,अंघोळी साबण इ. जीवनावश्यक वस्तूंच्या 125 किट तयार करून वाटप करण्याचा निर्णय घेतला. आम्हीही कोरोनाच्या  लढाईत प्रशासनासोबत असल्याचे आपल्या  कृतीतून दाखवून दिले. मंडलाधिकारी आप्पासो जिनराळे, गावकामगार तलाठी दीपक कांबळे यांच्याकडे या जीवनावश्यक वस्तूंच्या किट सुपूर्त करण्यात आल्या.यावेळी ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्याना सुध्या 10 किट्स ह्या देण्यात आल्या , प्राथमिक आरोग्य केंद्र मधील कर्मचारी यांना चहा व नाश्त्याच्या साहित्याचे वितरण करण्यात आले .यावेळी अध्यक्ष दयानंद सलाम,उपाध्यक्ष कल्लापा वांद्रे,वसंत वांद्रे,काशीनाथ जाधव,दयानंद लांडे,रमेश डोंगरे,सिकंदर कंडगावकर ,सचिन पाटील,दिलीप केसरकर,श्यामराव पाटील,मयूर हजारे,बापू व्हनयलकर,कृष्णा साळुंखे,उत्तम वांद्रे, विनायक पोटेकर,संजय पाटील,दयानंद टक्केकर,पांडुरंग पाटील,गुलाब पाटील,दत्ता पाटील,नंदकूमार बेळगावकर,सुधीर जाधव,गणपत भोगण,राणबा तोगले,कृपावंत बिर्जे, राजू हल्याळी,संपत पाटील,विजय वांद्रे,जोतिबा भोगण,बाबासाहेब मुल्ला,गोविंदा पाटील,सोमशेखर मिश्रकोटी,जोतिबा वांद्रे, वैजनाथ पाटील,सचिन गजरे,जगदीश अंगडी,आदीसह व्यापारी वर्ग उपस्थित होता.

'कोवाड व्यापारी संघटनेने जो उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे .अशा प्रकारे संकट काळात  समाजातील विविध स्तरातून मदतीच्या रूपातून अनेक हात एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच आपण लढत असलेली लढाई जिंकू शकेन असे चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment