शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप कसा करायचा? मुख्याध्यापकांच्यासमोर अडचणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2020

शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप कसा करायचा? मुख्याध्यापकांच्यासमोर अडचणी

अडकूर (संजय पाटील)
चंदगड तालूक्यातील सर्व शाळांना मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर यांचे आदेशान्वये शाळेला पुरवठा झालेला मार्च एप्रिल २०२० महिन्याचा तांदूळ व धान्यादी मालचे वितरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. असा  माल शाळा स्तरावर शिल्लक आहे. पण सध्या कोरोनाची भिती, लॉक डाऊनची परिस्थिती पाहता या मालाचे वितरण विद्यार्थी वर्गापर्यंत कसे करायचे याचाच प्रश्न मुख्याध्यापकाना पडला आहे.
शासनाच्या आदेशानुसार लाभार्थ्याना  तांदूळ व कडधान्याचे वितरण  टप्प्याटप्प्याने करावयाचे आहे. शाळेतील  पटानुसार मुख्याध्यापक, वर्गशीक्षक, एसएमसी यांनी नियोजन करुन ५ ते ६ दिवसात शाळेतील संपूर्ण शिल्लक साठा सर्व लाभार्थांना देणेचा आहे. इयत्ता निहाय, प्रत्येक तासाला किती पालक बोलवावे लागतील, सुरक्षित अंतर ठेवून, गर्दी न करता, ३ ते ४ वर्गखोल्यांचा वापर वितरणासाठी करुन, आजारी विध्यार्थाला एसएमसी कडून घरपोच तांदूळ व कडधान्ये समप्रमाणात पोहोचवावीत. एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तसेच जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कोरोना विषाणू प्रादूर्भाव प्रतिबंधक सूचनांचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. बचत गटाकडे तांदूळ व धान्य आदी माल देण्यात येऊ नये. केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील दररोज किती शाळांनी, वितरण केले याचा अहवाल व्हॉट्सअ‍ॅप वर कळविणेचे आहे. दोन्ही विषय संवेदनशील असलेने पत्रात नमूद तरतूदीनुसार  काळजीपूर्वक व सूरक्षित कार्यवाही करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पण हे सर्व करताना अनेक अडचणी आहेत. बहुतांश माध्यमिक शाळामध्ये परिसरातील ८ते १o गावातील विद्यार्थी येतात. त्यामळे अशा वातावरणात एवढया गावातील विद्यार्थी वर्गाला शालेय पोषण आहाराचे वितरण कसे करावे हाच प्रश्न मुख्याध्यापकासमोर आहे. धान्य तसेच शाळेत ठेवायचे तर ते खराब होण्याचा धोका आहे. यापेक्षा लॉक डाऊन संपल्यानंतर धान्य वितरण केल्यास सोपे होईल.


No comments:

Post a Comment