![]() |
राजेश रामाणा कुट्रे |
नांदवडे (ता. चंदगड) येथून राजेश रामाणा कुट्रे (वय-20) हा युवक बेपत्ता झाल्याची माहीती वडील रामाणा कुट्रे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. 28 मार्च 2020 सकाळी दहा वाजता तो घरातून निघून गेला. सायंकाळी सात वाजपेर्यंत घरी आलाच नाही. घरच्यांनी वाट पाहून नातेवाईकांशी संपर्क केला. मात्र तो कोठेही मिळून न आल्याने वडीलांनी याबाबतची वर्दी आज चंदगड पोलिसात दिली आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे - रंगाने सावळा, अंगाने मध्यम, नाक पसरट, उंची 5 फूट 4 इंच, केस काळे बारीक, अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळी जीन्सपॅन्ट, सोबत सायकल व मतीमंद आहे. या वर्णणाची व्यक्ती सापडल्यास चंदगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. कॉ. महेश बांबळे तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment