शिरगाव मयताच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब निगेटीव्ह, तालुक्यासाठी दिलासादायक बातमी - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2020

शिरगाव मयताच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब निगेटीव्ह, तालुक्यासाठी दिलासादायक बातमी


चंदगड / प्रतिनिधी
मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील मुंबईहून आलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी (ता. 31) ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हि व्यक्ती कोरोना संशयित असल्याची चर्चा होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्या व्यक्तीच्या संपर्कातील कुटुंबासह अन्य एकवीस जणांना गडहिंग्लज येथे विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यातील पाच जणांचे स्वॅब बुधवारी पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्याचे स्वॅब तपासणीमध्ये निगेटीव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले. त्यामुळे सद्यातरी तालुक्यातील लोकांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. त्याचबरोबर उर्वरीत 16 जणांचे स्वॅब तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर सर्वकाही चित्र स्पष्ट होणार आहे. 

No comments:

Post a Comment