कोरोनाच्या आपत्तीमुळे काजू बागायतदार अडचणीत, बोंडे सडत असल्याने नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2020

कोरोनाच्या आपत्तीमुळे काजू बागायतदार अडचणीत, बोंडे सडत असल्याने नुकसान

दौलत हलकर्णी (संतोष सुतार)
कोरोना व्हायरसच्या पाश्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन केल्याने चंदगड तालुक्यातील काजु बागायतदार,  व्यवसायिक,  शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मुंबई येथील काजु व्यापारी यांनी चंदगड तालुक्यातील काजु उद्योजकांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. त्यातुन सावरतात तोपर्यंत कोरोणाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे पुन्हा तालुक्यातील काजु उद्योगावर संकट आले आहे. लाखो रुपये कर्ज काढून तालुक्यात बरेच लहाण मोठे काजुवर प्रक्रिया करणार उद्योग कार्यरत आहेत. ह्या काजु वरील संकटामुळे तालुक्याची अर्थिक परिस्थिती विस्कळीत होणार आहे.
१२५ ते १४० रूपये प्रतिकिलो अखेरीस असणारा काजुचा दर यावर्षी ७० ते ८० रुपयावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता २१ दिवस देश लॉकडाऊन केल्याने याचा फटका तालुक्यातील काजू बागायतदारांना कितपत बसला आहे. ऐन काजू हंगाम सुरू झाला आणि कोरोनाचे संकट आले, यामुळे सर्व उदयोग धंदे व्यापार बंद झाल्याने काजू खरेदी विक्रीला चाप बसला तसेच काजू बोंडू ही बागेत कुजत पडल्याने शेतकऱ्यांचे सर्व बाजूने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
लॉकडाऊण मुळे बंद झालेला काजूचा व्यवसाय काजू व्यापाऱ्यांकडून काजू कौडी मोलाने खरेदी करण्यास सुरुवात झाली. अचानकपणे घसरलेल्या काजूच्या दराने काजू बागायतदारांना मजुरी देखील सुटणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील गोव्याला जाणारा बोंडू ही थांबल्याने काजू बागायदारांचे दोन्ही बाजूने नुकसान झाल्याने नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्याने जिल्ह्याभरात व देशभरात वाहतूक केला जाणारा काजू जाग्यावरच पडून राहिल्याने काजू खरेदी करणेही भीती वाटू लागली आहे. त्यामुळे १२५ रु. किलो असलेला काजू ६० ते ७० रुपये दराने व्यापारी खरेदी करण्याची शक्यता आहे. शासनाकडून काजूची नुकसान भरपाई द्यावी कोरोनाच्या आजारामुळे तालुक्यातील काजू बागायतदारांचे  ऐन काजू हंगामात मोठे नुकसान झाले आहे. कौडी मोलाने खरेदी केला जात असून बोंडू वाहतूक थांबली असून मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काजू बागायतदार वर्गातून केली आहे.


No comments:

Post a Comment