मनोहर हेब्बाळकर यांच्याकडून कुदनुर परिसरात टोमॅटो. बटाटे व मास्क वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2020

मनोहर हेब्बाळकर यांच्याकडून कुदनुर परिसरात टोमॅटो. बटाटे व मास्क वाटप


कालकुंद्री (प्रतिनिधी) 
कुदनुर (ता. चंदगड) येथील गणेश खडीमशीन चे मालक मनोहर हेब्बाळकर व त्यांचा मुलगा नागेश हेब्बाळकर यांच्यावतीने कुदनुर, कालकुंद्री ग्रामस्थांना टोमॅटो, बटाटे तसेच 200 पेक्षा अधिक मास्क वाटप करण्यात आले.
कुदनुर येथील सर्व प्रकारची दुकाने कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली आहेत. गेल्या चार दिवसापासून दूध संस्थांमधील संकलनही बंद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हेबाळकर यांच्या उपक्रमामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. साहित्य वाटप करण्यासाठी हेब्बाळकर यांना बबन वडर, रसूल मुल्ला आदींनी सहकार्य केले.

1 comment:

Unknown said...

खरंच खूप कौतु👌👌👌कास्पद कार्य...अभिनंदन 🙏🙏🙏🙏

Post a Comment