नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे संचारबंदी नियमाचा भंग केल्याप्रकरणी दूचाकी व चारचाकी वाहनधारकावर नेसरी पोलीसांनी कारवाई करून 25 वाहने ताब्यात घेतली आहेत.
२३ मार्चपासून लॉक डाऊन चालू झाले. यानंतर या नेसरी परिसरातील मुंबई, पुणे येथे राहणाऱ्या काहींनी बेकायदेशीरपणे गावी येण्यास सुरवात केली. वाहन बंदी असतानाही हा बंदी नियम मोडल्याने तसेच कोणतेही अत्यावश्यक काम नसताना गाडीवरून ये - जा करणाऱ्यावर नेसरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील यानी कारवाई करून अशी वाहने ताब्यात घेतली. यामध्ये १८ दूचाकी तर ७ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत अशी कारवाई केली जाणार आहे, नागरिकांनी घरीच थांबावे, अनावश्यक रस्त्यावरून फिरू नये असे आवाहन पीएसआय प्रविण पाटील यांनी केले आहे. नेसरी पोलीस स्टेशन अंतर्गत २६ गावे येतात. या सर्व गावामध्ये सतत गस्त घालण्यात येत आहे. तसेच हेब्बाळ जवळ कर्नाटक - महाराष्ट्र सिमेवर चेकनाका उभारला आहे. येथे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. होम कॉरंटाईन केलेल्या व्यक्ति सुद्धा घरीच आहेत का ते सुद्धा तपासले जात आहे. त्यामूळे नागरिकानी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही पीएसआय पाटील यानी केले.
No comments:
Post a Comment