कोवाड / प्रतिनिधी
येथे तीन दिवसांच्या लॉकडाउन नंतर दूध संस्थांतून दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. दररोज सायंकाळी दूध संस्थांसमोर लोकांच्या रांगा लागत आहेत. मास्क नसलेलेही लोक रांगेत उभे राहत असल्याने कोवाड लॉकडाउन लिकेज झाले आहे.
ग्रामपंचायतीने शासन निर्णय होईपर्यंत गावात लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार बंद केले आहेत. गावाच्या सीमाही सील केल्या आहेत. ३० मार्च पर्यंत गावातील भाजीपाला व किराणा दूकाने दररोज दोन तास सुरु ठेवली होती. पण परिसरातील नागरिकांची गर्दी होत असल्याने ग्रामपंचायतीने दक्षता समितीबरोबर चर्चा करुन ३१ मार्च पासून शंभर टक्के लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे किराणा भाजीपाला व दूध संस्थांही बंद होत्या. परंतू १ एप्रिल पासून दूध संस्था सुरु केल्या आहेत. दुध संकलनावेळी दुध संस्थेसमोर नागरिकांची गर्दी होत आहे. स्थानिक दुध विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दुध पुरवठा करणान्यांच्यापेक्षा दुध घेणाऱ्यांची गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंग मोडीत काढले आहे. शेजारच्या गावानी कोरोनाचा संसर्ग । रोखण्यासाठी गावातील बँका व दुध संस्थाही बंद ठेवल्या आहेत. कोवाड येथे मात्र बँका आणि दुध संस्था सुरु झाल्याने नागिरकांचीही वर्दळ वाढत आहे.
No comments:
Post a Comment