पुंडलिक वैजनाथ आपटेकर |
कागणी (ता. चंदगड) येथील शेतकरी पुंडलिक वैजनाथ आपटेकर (वय 48) यांचा बुधवारी (दि. 22) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन गडहिंग्लजला हलवण्यात आले होते. मात्र सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
दुपारी बारा वाजता त्यांच्या शेतात सर्पदंश झाला. कोवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंधक लस देऊन उपचार करण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले. मात्र सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment