बेळगाव जिल्ह्यातील करोना बाधितामुळे शिनोळीत कडक पोलिस बंदोबस्त - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2020

बेळगाव जिल्ह्यातील करोना बाधितामुळे शिनोळीत कडक पोलिस बंदोबस्त

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिनोळी येथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
शिनोळी / प्रतिनिधी
         कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. शिनोळी मधून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून देश,राज्य, जिल्हा लाॅकडाऊन केला गेला असून महाराष्ट्र -कर्नाटक सीमा असलेल्या वेंगुर्ले -बेळगाव हमरस्त्यावर शिनोळी येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
       चंदगड पोलिस ठाण्याचे निरिक्षक सातपूते यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आर. एस.जाधव कर्मचारी बसवराज पाटील,यांचेसह आरोग्य कर्मचारी राहूल धामणेकर, एम.एस.वाघमारे यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी नेमणुक केली आहे. त्याचबरोबर माणगाव प्राथमिक आरोग्य अधिकारी ए. टी. पठाणे यांच्या निरीक्षणाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. कोकण तसेच चंदगडच्या आणि बेळगावहून चंदगड व कोकणात जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता रहदारीला अटकाव करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment