कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी होसुर गावानं तोडला इतरांशी संपर्क, गाव झालं सेल्फ कोरंटाईन - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2020

कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी होसुर गावानं तोडला इतरांशी संपर्क, गाव झालं सेल्फ कोरंटाईन

होसूर गाव सेल्फ काॅरंटाईन झाल्यामुळे गावात सर्वत्र सामसुम आहे. 
तेऊरवाडी / प्रतिनिधी   
जगभरात कोरोणा रोगाने धुमाकूळ घातला असून भारतासहित राज्यात देखील कोरोणा बाधित रुग्णाचा आकडा वाढत चालला आहे.अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेली कर्नाटक सीमा आणि कर्यात भागातील बेळगाव ते आजरा या प्रमुख असलेल्या रस्त्यावरील होसुर गावानं आजपासून तीन दिवसासाठी संपूर्ण भागाशी आपला संपर्क तोडण्याचा निर्णय हा ग्रामस्तरीय दक्षता समितीमध्ये घेण्यात आला असून गावातील दूध संस्था व्यतिरिक्त पिठाच्या गिरण्या, किराणा दुकानासह सर्व व्यवहार बंद राहणार आहेत ,तसेच शेतीची कामे सुध्या या कालावधीत करता येणार नाहीत. अवघ्या 8 किलोमीटर वर बेळगुंदी तसेच बेळगाव ला कोरोनाने दस्तक दिल्याने सीमाभागावातील प्रत्येक गावाने धास्ती घेतली असून कर्नाटक राज्याची सीमा ही या गावाच्या सीमेला लागून आहे.जनता कर्फ्यू पासून गाव जागरूक असून पुढील संभाव्य धोका लक्षात घेता गावातील सर्व नागरिकांनी स्वतः ला सुरक्षित करण्याच्या हेतूने आज गावातील सर्व गल्लीबोळसकट गावात येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत.त्याची तात्काळ अमलबजानीही करण्यात आली असून जश्या बॅरीकेट्स उभारल्या जातात त्याप्रमाणे प्रत्येक गल्या ह्या आज बंदिस्त केल्या असल्याची माहिती गावचे सरपंच पांडुरंग सुतार,उपसरपंच लक्ष्मण राजगोळकर यांनी दिली ,यावेळी दक्षता समितीच्या सदस्यांसह  गावातील सर्व ग्रामस्थ यांनी गावच्या हितासाठी निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरातून झाल्याचे बघायला मिळत आहे,त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचे कठोर पालन करून कोरोना विरुद्ध च्या लढाईत सहकार्य करण्याचे आवाहन हे समितीमार्फत केले आहे.

No comments:

Post a Comment