आमदार राजेश पाटील यांच्याकडून महिन्याचा पगार कोविड निधीसाठी - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2020

आमदार राजेश पाटील यांच्याकडून महिन्याचा पगार कोविड निधीसाठी

आमदार राजेश पाटील आमदारकीचा पगार कोविड निधीसाठी हसन मुश्रीफ यांचेकडे देताना सोबत भैय्या माने, अभय देसाई.
तेऊरवाडी ( प्रतिनिधी)
चंदगड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी आमदारकीचा एक महिन्याचा पगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द केला.  महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना संसर्गाच्या साथीमध्ये लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्षाच्या सर्वच आमदारांना एक महिन्याचा पगार देण्याची विनंती केली आहे . त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांच्या कोविड-१९ निधीमध्ये देण्यासाठी आमदार श्री. पाटील यांनी हा निधी दिला. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, अभय देसाई, तानाजी गडकरी आदी प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment