चंदगड तालुका हॉटेल, खानावळ मालक संघटनेच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री फंडासाठी मदत - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2020

चंदगड तालुका हॉटेल, खानावळ मालक संघटनेच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री फंडासाठी मदत

चंदगड हॉटेल, खानावळ मालक संघटनेच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री फंडासाठी मदत शाखा व्यवस्थापक अमित मिश्रा यांच्याकडे देताना संघटनेचे पदाधिकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
करोना विषाणुचा दिवसेनदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक लोक शहरामध्ये अडकले आहेत. करोनाशी लढण्यासाठी रुग्णांलयामध्ये मेडिकल एक्युपमेंटची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे चंदगड तालुका हॉटेल व खानावळ मालक असोसिएशनच्या वतीने करोना निर्मुलनासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये रक्कमेचे धनादेश आज बँक ऑफ इंडिया चंदगड शाखेचे व्यवस्थापक अमित मिश्रा यांच्याकडे असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष गावडे, संघटक महेश पाटील, नारायण गावडे, खजिनदार प्रकाश दळवी व शरद गावडे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आला.

No comments:

Post a Comment