निट्टूर येथील संशयिताचा अहवाल निगेटिव्ह, आरोग्य विभागाने सोडला सुटकेचा निश्वास - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2020

निट्टूर येथील संशयिताचा अहवाल निगेटिव्ह, आरोग्य विभागाने सोडला सुटकेचा निश्वास


चंदगड / प्रतिनिधी
निट्टुर (ता. चंदगड) येथील कोरोना संशियत रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने चंदगड तालुका आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. चंदगड तालुक्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही,  त्यामुळे नागरीकांनी अफवा पसरवु नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी केले आहे.
                                                                    व्हीडीओ पहा
चंदगड हा कर्नाटक सीमेलगत असणारा तालुका असल्यामुळे चंदगड सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील बेळगुंदी येथे संशयित रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने त्या गावचे नातेसंबंध चंदगड तालुक्यातील गावाशी  असल्याने चंदगड तालुक्यात याबाबत मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी चंदगड तालुक्यातील सिमेलगतची 11 गांव सीमा बंद केली आहेत. प्रशासनाने होम कॉरेंन्टाईन लोकांच्यावर करडी नजर ठेवली आहे. 

No comments:

Post a Comment