चंदगड येथे आर्या बायो फ्लेमिंग कंपनी च्या गोदामाला आग, 25 लाख रुपयाचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2020

चंदगड येथे आर्या बायो फ्लेमिंग कंपनी च्या गोदामाला आग, 25 लाख रुपयाचे नुकसान

चंदगड येथे आर्या बायो फ्लेमिंग कंपनी च्या गोदामाला लागलेली आग.
चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड येथे आर्या बायो फ्लेमिंग ब्रिक्वेट या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.आज सकाळी पहाटे च्या सुमारास या  परिसरातून फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती दिली.या आगीत कंपनीचे जवळपास पंचवीस लाखांचे नुकसान झाले आहे.  आर्या बायो फ्लेमिंग कंपनी बायोमास ब्रिक्वेट्स तयार करण्याची कंपनी असून वेस्टेज इज वेल्थ या संकल्पनेतून शेतातील पडलेला पालापाचोळा पिकाचे तूस, शेंगा टरफल सोयाबीनचे टरफल, लाकडाचा कोंडा ,भाताची फोल ,अशा अनेक सुकलेल्या पदार्थाना एकत्रित करून यापासून बायोमास ब्रिक्वेट्स तयार करण्याचा प्रोजेक्ट या ठिकाणी आहे. आर्या ब्रिकेट्स बनवणारी कंपनी अनिकेत हळदणकर कुटुंबाच्या कडून चंदगड येथे कार्यरत आहे .सकाळी लागलेल्या आगीमध्ये पंचवीस लाख रुपयाचे बायोमास रॉ मटेरियल जळाले आहे.आज पहाटे पाचच्या दरम्यान लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली आग रात्री उशीरापर्यंत   आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.  गडहिग्लज  येथील नगरपरिषद चा अग्निशमन दलाची मदत चंदगड येथे घेण्यात आली व मुरगूड येथील अग्निशमन दलाची मदत अजून सुरू आहे  आत्तापर्यंत 20 पाण्याचे टँकरने पाणी आणले असून स्थानिक पाण्याचे चार टँकरही या ठिकाणी कार्यरत आहेत.

'गडहिंग्लज वरून अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब येऊन आग विझवणेपर्यत  पर्यंत बरेच नुकसान झालेले असते.आज लागलेल्या आगीत सुध्दा आर्या बायो फ्लेमिंग कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे चंदगड नगरपंचायतीने चंदगड येथे अग्निशमन दलाची स्थापना करावी, जेणेकरून तालुक्यात कुठेही अशी दुर्घटना घडली तर वेळीच मदत पासून होणारे नुकसान टाळता येऊ शकेल,अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

No comments:

Post a Comment