अन...कोवाड येथे कॉरंटाईन झालेले युवक सरसावले वृक्षारोपणासाठी, सी. एल. न्युजच्या बातमीने प्रेरित - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2020

अन...कोवाड येथे कॉरंटाईन झालेले युवक सरसावले वृक्षारोपणासाठी, सी. एल. न्युजच्या बातमीने प्रेरित

रोपवाटीकेसाठी खोदलेले खड्डे.
तेऊरवाडी/प्रतिनिधी ( एस.के. पाटील ):-
          सी. एल. न्युज ने काल ३० मे रोजी  सामाजिक वनीकरण विभाग  गडहिंग्लजच्या हडलगे येथील रोपवाटिकेची बातमी व व्हीडिओ प्रसारित केला होता.सदर रोपवाटिकेची बातमी व व्हीडिओ  कोवाड येथील सर्वोदय  इंग्लिश मेडिअम स्कूल कोवाड  या ठिकाणी कॉरंटाईन असलेल्या मुंबई स्थित कोवाडच्या  युवकानी पाहिला . या बातमीमुळे प्रेरित होऊन  हडलगे येथील रोप वाटीकेमधून रोपे आणून शालेय परिसरात वृक्षारोपन करण्याचा निर्धार केला आहे .त्याबरोबरच चंदगड लाईव्ह न्यूजने  वृत्त प्रसिद्ध केलेबद्दल सी. एल.  न्यूजचे अभिनंदन केले.
               याठिकाणी पुणे,मुंबई स्थित कोवाड मधील अनेक युवक कॉर टाईन झाले आहेत. सामाजिक बंधीलकीच्या जाणिवेतून काही याठिकाणी काहीतरी करण्याची कल्पना त्यांच्या मनात उभारी घेत होती .त्यातच काल प्रसारीत झालेल्या बातमीतून त्यांच्या मनात भन्नाट कल्पना सूचली आणि सर्वानुमते याठिकाणी वृक्षाची रोपे लावण्याचा निर्णय घेण्यात आला .त्यानुसार त्यानी प्रथमतः सर्वोदय संस्थेची परवानगी घेतली.या समाजकार्यात संस्थेचे अध्यक्ष ए. एस.जांभळे यांनी देखील त्याना सहकार्य करण्याचे ठरविले.आमच्या सी. एल. न्युज च्या प्रतिनिधींशी संवाद साधून लगेच रोपे कशा प्रकारे उपलब्ध करता    येईल यावर चर्चा केली व प्रतिनिधींनी ती उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. त्यानुसार उद्या रविवारी दि ३१ मे रोजी . सामाजिक वनिकरण विभाग गडहिंग्लज परिक्षेत्राचे वनपाल मारुती डवरी , कोवाडचे सरपंच,उपसरपंच व  ग्राम स्तरीय कमिटी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण होणार आहे. कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत देखील या युवकांनी वृक्षारोपण चा निर्णय घेऊन सर्वांसमोर आदर्श ठेला आहे.सर्व भागातून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment