कोरानाच्या पार्श्वभूमीवर कुदनूर येथे औषध फवारणी - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2020

कोरानाच्या पार्श्वभूमीवर कुदनूर येथे औषध फवारणी

कुदनूर : औषध फवारणी करताना सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे शेजारी अन्य.
कागणी : प्रतिनिधी
कुदनूर (ता. चंदगड) येथे शुक्रवारी दि. 28 रोजी दोन कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली. सरपंच शालन कांबळे यांच्या मार्गदर्शनाख़ाली सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे यांनीे स्वतःहून प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी केली. भीतीपोटी ओषध फवारणी करण्यास कोणीही पुढे येईना, त्यामुळे सरपंच शालन कांबळे यांचे पती चंद्रकांत कांबळे यांनीच स्वता पुढे होऊन फवारणी केली. त्यांना महादेव रेडकर, सागर नोकुड़कर यांचे सहकार्य लाभले.
गोकुळनगर व विद्यानगर याठिकाणी रस्ता, गटर व घराची समोरील बाजूवर हायड्रोक्लोरिक ॲसिड फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. गोकुळनगर येथील येथील दांपत्य कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्याला होते. मात्र पंधरा दिवसापूर्वी ते गावाकडे आले होते. क्वारंटाईनसाठी गावातील शाळेमध्ये जागा नसल्याने ते गावातीलच अलग असणाऱ्या घरांमध्ये राहिले होते, मात्र ते काही दिवसानंतर आजारी पडले. यानंतर घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत हे दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment