चंदगड तालुक्यात आज सहा नव्या रुग्णांची भर, रुग्णसंख्या ५१ - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2020

चंदगड तालुक्यात आज सहा नव्या रुग्णांची भर, रुग्णसंख्या ५१

चंदगड / प्रतिनिधी
देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच चंदगड तालुक्यातही रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात नांदवडॆ, कानुर खुर्द, मोऱ्याचीवाडी येथे प्रत्येकी एक तर 
बुजवडॆ यथे तीन असे दिवसभरात एकूण ६ नवे रुग्ण सापडले आहेत. काल रात्री उशिरा काजिर्णे येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे चंदगड तालुक्याची करोना रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. 
चंदगड तालुक्यातील रुग्णसंख्या दिवसेनदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागात भितीचे वातावरण आहे. शहरातील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत उघडण्याला परवानगी दिली असली तरी तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भविष्यात शहरातील व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. तालुक्याच्या खेड्या-पाड्यात पुणे-मुंबईसह आलेल्या नागरीकांच्यामुळे करोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. यासाठी गावपातळीवर क्वारंटाईन केलेल्या नागरीकांच्यासाठी कडक धोरण अवलंबायची गरज आज निर्माण झाली आहे. 


No comments:

Post a Comment