चंदगड / प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज हजारोंने वाढत आहे. पुणे-मुंबईवरुन आलेल्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील करोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या चारशेच्या पार गेली आहे. गेले तीन दिवस चंदगड तालुक्यात एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र आज दुपारी आलेल्या अहवालानुसार चंदगड तालुक्यातील सत्तेवाडी येथे २४ मे २०२० रोजी सापडलेल्या पाच रुग्णांच्या संपर्कातील एक व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे एका सत्तेवाडी गावातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता २६ वर पोहोचली आहे.
२४ मे २०२० रोजी चंदगड तालुक्यात एकाच दिवशी सत्तेवाडी येथील पाच व नांदुरे येथील दोन असे सात रुण सापडले होते. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर चंदगड येथील बाजारपेठ शुक्रवार (ता. २२) ते बुधवारी (ता. २७) पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. आज गुरुवारी बाजारपेठेतील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरु करण्यास मुभा दिली आहे. रविवारी २४ मे रोजी सत्तेवाडी येथे सापडलेल्या पाच पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आज गुरुवारी सापडलेला २७ वर्षाचा व्यक्ती आला होता. या व्यक्तीचा स्वॅब २५ मे रोजी घेण्यात आला होता. आज चौथ्या दिवशी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. सत्तेवाडी येथे या सर्वांना शाळेत क्वारंटाईन केले होते. या व्यक्तीला उपचारासाठी चंदगड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आणण्यात येणार असल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली.
No comments:
Post a Comment