एन. बी. इंडस्ट्रीज व ॲक्वान कंपनी कडून क्वारंटाईन केलेल्यांना मोफत पाणी बॉटलचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2020

एन. बी. इंडस्ट्रीज व ॲक्वान कंपनी कडून क्वारंटाईन केलेल्यांना मोफत पाणी बॉटलचे वाटप

चंदगड येथील एन. बी. इंडस्ट्रीज व ॲक्वान कंपनी कडून पिण्याच्या पाणी बॉटलचे वितरण करताना रोहन नांदवडेकर, जानबा पाटील,अनिल चांदेकर व इतर
कोवाड / प्रतिनिधी
       एन. बी.इंडस्ट्रीज व ॲक्वान कंपनी,चंदगड कडून कोवाड व तेऊरवाडी येथील कोरोणा सेंटर,प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस स्टेशन,कोवाड ला मोफत  पाणी बॉटल चे वितरण करण्यात आले.
      पुणे-मुंबई बरोबरच इतर शहरातून आलेल्या आणि कोरंटाईन झालेल्या संपूर्ण चंदगड तालुक्यातील आपल्या बांधवांना चंदगड येथील ॲक्वान कंपनी  मोफत ही सेवा पुरवत आहे .आपण काय पिकवतो तर कंपनी मार्फत पाणी पिकवतो असे म्हणत यापलीकडे जाऊन पाण्याबरोबरच आपल्याला शक्य होईल त्या स्वरूपाची मदत करणार असल्याचे रोहन नांदवडेकर यांनी सांगितले.
       यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ब्लॉक प्रभारी जाणबा पाटील म्हणाले की ,ज्या प्रकारे मुंबई करांची नाळ गावाशी जोडली गेली आहे त्याच प्रकारे गावातील लोकांची देखील मनं ही मुंबईकरांशी जोडली गेली आहेत.त्यामुळे शक्य होईल ती मदत नांदवडेकर कुटुंबीयासोबत राहून करणार असल्याचे स्पष्ट केले.
     यावेळी ग्रामस्तरीय कमिटीच्या सदस्य रणजित भातकांडे म्हणाले,कोरोना सारख्या या परिस्थितीत आज सगळेच घाबरून गेलेले आहेत.ग्रामीण भागात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे अशा परिस्थितीत नांदवडेकर कुटुंबीय गेले महिनाभर वेगवेगळ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करत असून पाणी बॉटल चे वितरण करत आहेत .त्यांचा समाजाप्रती सुरू असलेला उपक्रम स्तुत्य आहे.अशा प्रकारे समाजातील अनेक हात समोर आले तर आपण नक्कीच कोरोना ला हरवू शकेन. यावेळी अनिल चांदेकर,कोवाड चे उपसरपंच विष्णू आडाव,सदस्य आदम मुल्ला,ग्रामसेवक जी.एल.पाटील,गणेश कुंभार,विष्णू बुरुड,मयूर हजारे आदी उपस्थित होते.
      मार्गील वर्षीच्या ऑगस्ट मध्ये अनेक गावात आलेल्या महापुरामध्ये याच मुंबईकरासहित वेगवेगळ्या ठिकाणाहून वेळेत मदत आली होती,पण आजच्या परिस्थितीत संकट हे मुंबईकरासहित बाहेरून येणाऱ्या लोकांवर ओढवले असताना सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची खरी गरज असल्याचे यावेळी रोहन नांदवडेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment