यमेकोंड (ता. आजरा) येथे स्वच्छता करताना ग्रामस्थ, उपस्थित वैदयकिय अधिकारी. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
येमेकोंड (ता. आजरा) येथे डेंग्यूसदृष् रुग्ण गुरूवार दिनांक 21 मे रोजी सापडले होते. तर बुधवारी 5 रुग्णांचे रक्ताचे नमुने आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दिनांक 27 मे रोजी आला. या अहवालामध्ये 5 पैकी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. आर. जी. गुरव यांनी बोलताना सांगितले.
आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण गावचा आरोग्य सर्वे झाला असून लोकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट गडद होत असताना येथे डेंग्यूची लक्षणे आढळलेने खबरदारी म्हणून मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर. जी. गुरव, आरोग्य सेविका रुपाली गंगली, अभिजित माळवे, पर्यवेक्षक जे. एस. बोकडे,आशा वर्कर,मदतनीस, संपूर्ण ग्रामस्थ, सरपंच,उप सरपंच सर्व सदस्य या कामी परिश्रम घेत आहेत. सर्व गावची स्वच्छता, तसेच गावात धूर फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment