चंदगड कृषी विभाग व कृषी सेवा केंद्रामार्फत विविध गावात बियाणे, खते,औषधे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2020

चंदगड कृषी विभाग व कृषी सेवा केंद्रामार्फत विविध गावात बियाणे, खते,औषधे वाटप

कामेवाडी येथे बांधावर खत,बियाणे व औषधे वाटप करताना कृषि पर्यवेक्षक ए.एस.गारडे कृषि सहाय्यक एस.डी.मुळे व श्री साई शेती सेवा केंद्राचे मालक सचिन पाटील.
कोवाड / प्रतिनिधी 
       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून चंदगड तालूुका कृषि विभागाच्या पुढाकाराने श्री साई कृषी सेवा केंद्र व प्रियाका अॅग्रो याच्या  वतीने शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे, खते व औषधें वाटप करण्यात आले.
         शेतकरी राजा आगामी खरीप हंगामासाठी आंतरमशागत करून सज्ज झाला आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेअतर्गत येणाऱ्या कृषि सेवा केंद्रावर होणारी गर्दी टाळता येऊन होणारा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या पुढाकाराने शेतकरी गट व कृषि सेवा केंद्र यांचेमार्फत शेतकऱ्याना थेट त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे, खते व औषधें वाटप करण्याची योजना आखली जात आहे. याच माध्यमातून चंदगड तालुक्यातील कामेवाडी या गावात श्री साई शेती सेवा केंद्र,कोवाड मार्फत व कोवाड येथे प्रियांका अग्रो सर्विसेस, मार्फत कोवाड या ठिकाणी उपक्रम राबविला आहे. वाढता धोका लक्षात घेऊन,कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये तसेच खते व बियाणे यांची टंचाई भासुन खरीप हंगामात त्यांची धावपळ होऊ नये.  या दृष्टीकोणातून ही योजना राबविली असल्याचे तालुका कृषि अधिकारी किरण पाटील यांनी सांगितले.
      शेतकरी गटामार्फत त्या त्या गावातील मागणीनुसार पुरवठा हा केला जात आहे. यासाठी कृषि पर्यवेक्षक ए. एस. गारडे, कृषि सहायक एस. डी. मुळे व साई शेती सेवा केंद्र कोवाडचे सचिन पाटील व प्रियांका अग्रो सर्विसेस कोवाडचे अल्पी लोबो यांचे सहकार्याने प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर मागणीनुसार सदर मालाचे वाटप केले जात आहे. यापुढे देखील टप्याटप्याने बाकीच्या गावामध्ये वाटप केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment