हडलगे येथे उन्हाळी वायंगन भाताच्या मळणीला प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2020

हडलगे येथे उन्हाळी वायंगन भाताच्या मळणीला प्रारंभ

हडलगे ( ता. गडहिंग्लज ) येथे गोठणावर वायंगण भात मळणीतील भाताला वारे  देताना मग्न  असलेला शेतकरी .
तेऊरवाडी / प्रतिनिधी 
       हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे उन्हाळी भात - वायंगन भाताची कापणी व मळणीना सुरवात झाली आहे. पण वळीव पावसाने या कामात अडथळा निर्माण होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. 
        हडलगे गावाजवळून जाणारी घटप्रभा नदी बारमाही वाहत असल्याने या नदिकाठावर असणाऱ्या हडलगे , डोनेवाडी , तावरेवाडी आदि परिसरातील शेतकरी पावसाळी भात पीक घेतल्यानंतर पून्हा याच शेतात उन्हाळी वायंगन भात शेती पीक घेतात . सध्या या परिसरातील शेतातील भात कापणी मोठया प्रमाणात चालू आहे . पण अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाची मोठी तारांबळ उडत आहे . वरती कोरोनाचा कहर असत्याने .भात कापणी व मळणीला मजूर मिळणे अडचणीचे झाले आहे . हडलगे, डोणेवाडी, तावरेवाडी येथील शेतकरी भात कापणीनंतर ते पातीवर न सुखवता ओलेच भात उंच टेकडीवर आणून त्याची मळणी करुन गवत वाळवत  आहेत . या उन्हाळी भाताचा उतारा चांगला असल्याने शेतकरी समाधानी असला तरी अवेळी पावसाने मात्र तो चिंताग्रस्थ बनला आहे. मळण्या त्वरीत आटपून धूळवाफ भात पेरणीला शेती मशागतीची तयारी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत .


No comments:

Post a Comment