जमिन वाटणीच्या कारणावरुन मुलाकडून बापावर कोतत्याने वार, बाप गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2020

जमिन वाटणीच्या कारणावरुन मुलाकडून बापावर कोतत्याने वार, बाप गंभीर जखमी

चंदगड / प्रतिनिधी
      शेताची वाटणी न दिल्याच्या कारणावरुन कळसगादे (ता. चंदगड) येथे मुलाने बापाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने दत्तु बुधाजी दळवी (वय-65) हे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 19) दुपारी तीन वाजता घडली. या प्रकरणी मुलगा शंकर दत्तु दळवी व सुन रुपाली शंकर दळवी यांच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. जखमी दत्तु बुधाजी दळवी यांनी याबाबतची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे. 
    यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – वडीलांनी शेताची वाटणी करुन न दिल्याने मुलाचा वडीलांशी वाद सुरु आहे. मंगळवारी वडील दत्तु दळवी हे जनावारांना चरण्यासाठी सोडायला जात असताना मुलगा शंकर याने बापाकडे जमिनीची वाटणी देण्याची मागणी केली. यावेळी बापाला शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. त्याला समजावून सांगत असताना सुन रुपाली हिने त्यांना धरले. यावेळी मुलाने घराचे समोर छपर बांधित असलेल्या ठिकाणावरुन कोयता घेऊन वडिलांच्या डोकीत मध्यभागी व चेहऱ्यावर डावे बाजुस मारले. तसेच डाव्या हाताच्या दंडावर जोराची मारहाण करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी वडील दत्तु दळवी यांनी याबाबतची तक्रार चंदगड पोलिसांत दिली असून त्यानुसार मुलगा व सुन यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. काँ. श्री. बांबळे तपास करत आहेत. 

No comments:

Post a Comment