निट्टूरच्या माहेरवाशीनीसह पतीचा अपघाती मृत्यू, उंब्रजजवळ कारचा ताबा सुटल्याने दुर्घटना - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2020

निट्टूरच्या माहेरवाशीनीसह पतीचा अपघाती मृत्यू, उंब्रजजवळ कारचा ताबा सुटल्याने दुर्घटना

अपघातग्रस्त कार.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
         निट्टूर (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त सुभेदार शिवाजी पाटील यांच्या कन्या डॉ. अनुजा गावडे ( वय -३५ ) आणि त्यांचे जावई अमित आप्पा गावडे (वय - ३८) मूळ गाव चौकूळ (ता. आंबोली) जि. सिंधुदुर्ग हे पुण्याहून गावी येत असताना उंब्रज जवळ झालेल्या कार अपघातात दुर्दैवी मृत्यू  झाला.

उंब्रज येथे झालेल्या अपघातातील मृत झालेले अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे 
        उंब्रज पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी , मूळचे चौकुळ,आंबोलीचे असलेले दांम्पत्य सध्या पुणे या ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्यास होते.अमित गावडे हे इंजिनिअर असून ते खासगी कंपनीत नोकरी करत होते तर डॉ.अनुजा ह्या स्वतः चे क्लिनिक चालवत होत्या. काल रात्री 1 वाजता पुण्याहून कोल्हापूरमधील  चंदगड तालूक्यातील निट्टूर येथे असलेल्या मूलाला आणण्यासाठी वॅगनार (गाडी क्र. एम. एच. १२, जे यु, ८८९२) जात होत्या . यावेळी पहाटे साडे तीन च्या सुमारास उंब्रज,भोसलेवाडी जवळ डॉ. अनुजा हिचा कारगाडीवरील ताबा सुटल्याने डिव्हायडर वर गाडी धडकून सातारा लेन वरती पलटी झाली. यावेळी डॉ. हा अपघात इतका भयंकर होता की अपघातग्रस्थ कारचा चक्काचूर झाला . त्यामध्ये या दोघा पती पत्नींचा जागीच अंत झाला .अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ हायवे हेल्पलाइन कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलिम देसाई, रमेश खुणे व उब्रंज पोलिस स्टेशन कर्मचारी यांनी मदत केली.

                                            अखेर माय -लेकरांची भेट झालीच नाही
       लॉक डाऊन होण्यापूर्वी डॉ अनूजा हिने आपल्या पाच वर्षाच्या मूलाला  माहेर निट्टूर (ता. चंदगड) येथे पाठवले होते. पण लॉक डाऊन संपत नसल्याने माहेरी पाठवलेला मूलगा आईवडिलांच्या आठवणीने व्याकूळ बनला होता. तर इकडे पूणेमध्ये  स्वभावाने अतिशय प्रेमळ असणारी डॉ. अनुजा पण अस्वस्थ झाली होती .मूलाचा आठवणीने व्याकूळ झालेल्या या दोघानी गावी येण्याचा निर्णय घेतला. यामध्ये दुदैवाने या दोघांचाही   अपघातीअंत झाला आणि माय लेकरांची अखेर कायमची ताटातूट झाली. या घटनेचे वृत्त चंदगड तालूक्यात समजताच हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment