चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील पॉझिटीव्ह रुग्णांला उपचारासाठी पाठविले सीपीआरमध्ये - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2020

चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील पॉझिटीव्ह रुग्णांला उपचारासाठी पाठविले सीपीआरमध्ये

चंदगड / प्रतिनिधी
        मुंबईहून चंदगडला आलेल्या अलबादेवी (ता. चंदगड) येथील एकाचा करोना अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटीव्ह आल्याने चंदगड तालुक्याच खळबळ उडाली आहे. आज सकाळी या पॉझिटीव्ह रुग्णांला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णांलयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली. या घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. नागरीकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. 
        अलबादेवी येथील हि व्यक्ती कामानिमित्त मुंबई येथे रहात होती. ५ मे २०२० रोजी ते मुंबईहून खासगी गाडी करुन चंदगडला आली. यावेळी गाडीमध्ये पती-पत्नी, चार वर्षाचा मुलगा व चालक होता. हे कुंटुंब मुंबईहून ५ मे २०२० रोजी रात्री बाहेर पडल्यानंतर ६ मे २०२० रोजी सकाळी सहा वाजता किणी टोल नाक्यावरुन ते कुटुंब सकाळी नऊ वाजता गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णांलयात आले. यावेळी गडहिंग्लज येथे सांगण्यात आले की, चंदगड येथे स्वॅब घेण्याची सोय करण्यात आली असून तुम्ही तेथेच स्वॅब द्या. या दरम्यान सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत हा व्यक्ती गडहिंग्लज येथे थांबून होता. दुपारी दोननंतर गडहिंग्लज येथून 108 ची रुग्णवाहिका देवून त्यांना चंदगड येथे करोना केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. 
        चंदगड येथील करोना केअर सेंटर म्हणून उभारणी केलेल्या फादर ॲग्नेल स्कुलमध्ये ते ६ मे २०२० रोजी चार वाजता आले. ७ मे २०२० रोजी त्यांच्या सर्व कुटुंबियांचा स्वॅब घेण्यात आला. तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यातील एकाचा अहवाल ९ मे ला रात्री एक वाजता पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आज सकाळी त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णांलयातील करोना सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. त्या व्यक्तीची पत्नी व मुलगा याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना चंदगड येथे कॉरंटाईन करण्यात आले आहेत. गडहिंग्लज येथे ९ ते २ या काळात तो व्यक्ती कोणाच्या संपर्कात आला. याची माहीती घेण्याचे काम सुरु आहे. 
        अलबादेवी येथील पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नव्हती. हा व्यक्ती मुंबईहून आल्यामुळे त्या सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्याचा चुलत भाऊ मुंबईहून आलेल्या या कुंटुंबाला अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत रेफर केल्याचे पत्र घेवून चंदगडला आला होता. त्यामुळे त्याचाही स्वॅब घेऊन कॉरंटाईन करण्यात येणार आहे. चुलत भाऊ त्याचा थेट संपर्कात आलेला नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्याचाही स्वॅब घेतला जाणार आहे. 

अलबादेवी येथील हा पॉझिटीव्ह  व्यक्ती मुंबईहून किणी टोल नाक्यावरुन गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णांलय व त्यानंतर चंदगड येथे करोना केअर सेंटरमध्ये दाखल झाला आहे. सदर व्यक्ती गावात गेली नसल्याचे  पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment