कालकुंद्री परिसरात शेती मोटर पंप व केबल चोरांचा धुमाकूळ, हजारोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2020

कालकुंद्री परिसरात शेती मोटर पंप व केबल चोरांचा धुमाकूळ, हजारोंचे नुकसान

कालकुंद्री / प्रतिनिधी
     कालकुंद्री (ता. चंदगड) परिसरात गेल्या पंधरा दिवसात शेती विद्युत मोटर पंप व पंपाची सर्व्हिस वायर चोरण्याचा चोरांनी सपाटा चालविला आहे. 
     किटवाड धरण, कुदनूर ते दुंडगेपर्यंत वाहनाऱ्या पाच किमी लांब ओढा काठावर शेकडो शेतकऱ्यांचे विद्युत मोटर पंप आहेत. हा परिसर निर्जन असतो याचा लाभ फायदा घेत चोरट्यांनी या भागातील विद्युत मोटर पंपांची शेकडो मिटर सर्विस वायर लंपास केली आहे. त्यानंतर निर्ढावलेल्या चोरट्यांनी आता ताम्रपर्णी नदीकाठ परिसरातील विद्युत मोटर पंप व सर्विस वायरकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी गेल्या आठ दहा दिवसात ओढा काठावरील कल्लापा राणबा जोशी यांचा तीन एचपी मोटर पंप तर राजेंद्र इंत्राज मस्करेंज, भरत बाबू पाटील, रामू ओमाणा पाटील, प्रल्हाद दत्तात्रय पाटील,  जी. एस. पाटील आदी तर ताम्रपर्णी नदी काठावरील आप्पाजी ज्योती कोकितकर, कल्लापा रामचंद्र पाटील आदी शेतकऱ्यांच्या मोटर पंपांची प्रत्येकी पन्नास ते शंभर फूट अशी शेकडो फूट केबल कापून लंपास केली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन चालू असल्यामुळे या चोरट्यांना चोरीसाठी रान मोकळे झाले आहे. गावातील मोटर पंप धारकांनी एकत्र येऊन या चोरट्यांची माहिती देणाऱ्यास नाव गुप्त ठेवण्याच्या हमीवर योग बक्षिस देण्याचे ठरविले आहे. पोलिस यंत्रणाही कोरोना बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे मोटर पंप धारकांनी संघटितपणे सतर्क राहून चोरांना पकडून अद्दल घडवण्याचा निर्धार केला आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने या कामी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment