सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून चंदगड शहरातून कोरोनाबाबत जनजागृती फेरी - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2020

सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून चंदगड शहरातून कोरोनाबाबत जनजागृती फेरी

सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून चंदगड शहरातून कोरोनाबाबत जनजागृती फेरी काढताना अधिकारी व पदाधिकारी वर्ग.
चंदगड / प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समिती, तहसिल कार्यालय, पंचायत समिती व चंदगड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज दुपारी चंदगड शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून हि फेरी काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्यामध्ये जनजागृती करुन सोशल डिस्टन्सिंगचे महत्व पटवून देण्यासाठी व दुकानदारांना सुचना देण्यासाठी हि फेरी काढण्यात आली. यावेळी चंदगडचे दिवाणी न्यायाधीश ए. सी. बिराजदार, सह न्यायाधीश डी. एम. गायकवाड व तहसिलदार विनोद रणवरे प्रमुख उपस्थित होते. 
देशासह राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात चंदगड शहरात सोमवार (ता. 4) पासून दुकानामध्ये व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच चंदगड तालुक्यामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड शहरातील व शहरात येणाऱ्या लोकांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका, घरी रहा, सुरक्षित रहा, स्वत: सोबत कुटुंबाची काळजी घ्या, शासकीय नियमांचे पालन करा या विषयी जनजागृती करण्यासाठी हि फेरी काढण्यात आली. यावेळी दुकानदार व व्यापाऱ्यांना सकाळी दोनपर्यंत दुकाने उघडी ठेवावीत. सोशल डिस्टन्सिंग पाळले न गेल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची सुचना देण्यात आला. चंदगड शहराच्या संभाजी चौकातून बाजारपेठेतून कैलास कॉर्नर, रवळनाथ मंदिरासमोरुन कोर्टासमोर फेरीची सांगता झाली. यावेळी नगरपंचायतीच्या वतीने रिक्षातून स्पिकरने नागरीकांना सुचना करण्यात आला. यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, पोलिस निरिक्षक अशोक सातपुते, चंदगड नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित जगताप, सभापती ॲड. अनंत कांबळे, नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, स्विकृत नगरसेवक ॲड. विजय कडुकर यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment