चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील तरुणाला कोरोनाची लागण, भीतीचे वातावरण, आरोग्य यंत्रणा सतर्क - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2020

चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील तरुणाला कोरोनाची लागण, भीतीचे वातावरण, आरोग्य यंत्रणा सतर्क

चंदगड /  प्रतिनिधी  : 

  • कोल्हापूर जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असातानाच आज अलबादेवी (ता. चंदगड) येथील युवकाला कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने चंदगड प्रशासन हादरून गेले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 17 वर पोहचली आहे. चंदगड तालुक्यातील अलबादेवी गावातील एक तरूण मुंबईवरून ६ मे २०२०रोजी आला होता. त्याची स्वॅब तपासणी केली असता त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आलेला आहे. त्याला चंदगड ग्रामीण रूग्णांलयाच्या कोरोना केअर सेंटर तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी त्याचा चुलत भाऊ पत्र घेवून आला होता. त्यावेळी त्याचा चुलत भाऊ हा त्याच्या थेट संपर्कात नसला तरी त्याचीही तपासणी केला जाणार आहे. 
या रुग्णांला रात्री उशीरा कोल्हापूरच्या सीपीआरकडे रवाना करण्यात आल्याचे अडकूर आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले. एका बाजूला बेळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण आढळल्याने चंदगड तालक्यात भीतीचे वातावरण असतांनाच तालुक्यातच रुग्ण सापडल्याने भितीमध्ये आणखी भर पडली आहे  गुरुवारी जिल्ह्यातील चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, शुक्रवारी नव्याने तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या विभागातील सर्व मार्गही सील करण्यात आला आहेत. गेल्या महिन्यात चंदगड तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या घशातील स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यावेळी चंदगड तालुक्यात करोनाचा शिरकाव झाल्याच्या अफवा होता. आता मात्र चंदगड तालुक्यात कोरोना दाखल झाल्याने लोकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकारी यंत्रणा व आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. 

No comments:

Post a Comment