मौजे यमेहट्टी येथे बांधावर खत,बियाणे व औषधे वाटप करताना सरपंच श्री चाळू गावडे कृषि पर्यवेक्षक श्री एम डी पाटील कृषि सहाय्यक श्री सचिन नाईक महा लक्ष्मी कृषि सेवा केंद्राचे मालक श्री किरण गंगली |
कोवाड / प्रतिनिधी
सध्या देशासहित राज्यात 30 मे पर्यंत लोकडाऊन वाढवण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असून ग्रामीण भागामध्ये होणारा कोवीड 19 चा शिरकाव लक्षात घेता संपूर्ण खेडी भीतीच्या छायेखाली आहेत.अशा परिस्थितीत तालुका कृषि अधिकारी गडहिंग्लज यांचे पुढाकाराने महालक्ष्मी कृषि सेवा केंद्र,नेसरी यांचेमार्फत शेतकऱ्याना थेट त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे, खते व औषधें वाटप करण्यात आले.
शेतकरी राजा आगामी खरीप हंगामासाठी आंतरमशागत करून सज्ज झाला आहे.कोरोणा च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेअतर्गत येणाऱ्या कृषि सेवा केंद्रावर होणारी गर्दी टाळता येऊन होणारा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या पुढाकाराने शेतकरी गट व कृषि सेवा केंद्र यांचेमार्फत शेतकऱ्याना थेट त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे, खते व औषधें वाटप करण्याची योजना आखली जात आहे.याच माध्यमातून गडहिंग्लज तालुकतातील तारेवाडी, यमेहट्टी, काळामवाडी आणि तावरेवाडी या गावात हा उपक्रम राबविला आहे.वाढाता धोका लक्षात घेऊन,कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये तसेच खते व बियाणे यांची टंचाई भासुन खरीप हंगामात त्यांची धावपळ होऊ नये या दृष्टीकोणातून ही योजना राबविली असल्याचे तालुका कृषि अधिकारी,गडहिंग्लज चे पी.पी.पाटील यांनी सांगितले.
शेतकरी गटामार्फत त्या त्या गावातील मागणीनुसार पुरवठा हा केला जात आहे यासाठी कृषि पर्यवेक्षक एम. डी. पाटील,कृषि सहायक सचिन नाईक व महालक्ष्मी कृषि सेवा केंद्र,नेसरी चे किरण गंगली यांचे सहकार्याने प्रत्यक्ष शेतकऱ्याना त्यांच्या बांधावर मागणीनुसार सदर मालाचे वाटप केले जात आहे.यापुढे देखील टप्याटप्याने बाकीच्या गावामध्ये वाटप केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment