चंदगड तालुक्यातील पोलिसांना डाॅ. नंदाताई बाभुळकर यांचेमार्फत मल्टी प्रोटेक्शन मास्कचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

17 May 2020

चंदगड तालुक्यातील पोलिसांना डाॅ. नंदाताई बाभुळकर यांचेमार्फत मल्टी प्रोटेक्शन मास्कचे वाटप

डाॅ. नंदाताई बाभुळकर यांनी पोलिसांना मल्टी प्रोटेक्शन मास्कचे वाटप केले. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
        वाढत्या कोरोनाच्या संक्रमनास प्रतिबंध करण्याकरिता चंदगड पोलिस ठाणे अखत्यारीत येण्याऱ्या भागातील ठिकठिकाणी नाकेबंदी करून जे पोलिस बांधव अहोरात्र काम करित आहेत त्यांना योग्य सुरक्षा मिळावी याकरिता 6 लेअर मल्टी प्रोटेक्शन मास्कचे वाटप डाॅ नंदाताई बाभुळकर यांच्यावतिने करणेत आले. सदर मास्क कानुर चेक पोस्ट, शिनोळी चेक पोस्ट, पाटणे फाटा चेक पोस्ट, चंदगड फाटा काॅरंटाईन कक्ष, कोवाड पोलिस स्टेशन, होसुर नाका इ. ठिकाणी सेवा बजावत असणार्या सर्व पोलिस बांधवांना वाटप करण्यात आले व उर्वरित मास्क चंदगड पोलिस ठाण्यातील पोलिसांना सुपूर्द करण्यात आले. सदर मास्कचे वाटप करताना श्री. गणेश फाटक, श्री भैरू खांडेकर, श्री बाळासाहेब पाटील, श्री विनोद पाटील, श्री श्रीशैल नागराळ, श्री सागर पाटील आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment