मोदगे येथे "ना नफा, ना तोटा, या तत्वावर भाजी विक्री - चंदगड लाईव्ह न्युज

17 May 2020

मोदगे येथे "ना नफा, ना तोटा, या तत्वावर भाजी विक्री

 मोदगे : पिंपळकट्यावर भाजी विक्रीप्रसंगी जनार्दन पाटील, विष्णू पाटील आदी.
कागणी : प्रतिनिधी
मोदगे (ता. हुक्केरी) येथील कोरोना दक्षता कमिटीतर्फे एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला आहे. "ना नफा, ना तोटा, या तत्वावर गेल्या पंधरवड्यापासून भाजी विक्री सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना चांगली सुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. कोरोना कमिटीचे अध्यक्ष जनार्दन पाटील,  सत्तुराम कोलकार, विलास कांबळे, रत्‍नाबाई मांग, कृष्णा कोकितकर, नांदवडेकर, सुधाकर पाटील, विष्णू पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसात या गावात उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचे सिमाभागासह आजरा, चंदगड, गडहिंग्लज परिसरात चर्चा सुरु आहे.

No comments:

Post a Comment