चंदगडच्या कलाकाराची शॉर्टफिल्ममधून कोरोना जनजागृती "एस, वी कॅन" लघुपटाची पुणे येथे निर्मिती - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2020

चंदगडच्या कलाकाराची शॉर्टफिल्ममधून कोरोना जनजागृती "एस, वी कॅन" लघुपटाची पुणे येथे निर्मिती

कागणी / (संदीप तारिहाळकर)
           मुळचा नागरदळे (ता. चंदगड) येथील नाट्य कलाकार व पुणे (कोथरूड) येथे सध्या अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या सूर्यकांत शंकर गुरव या तरुणाने कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईने कसे बाहेर पडावे, यावर आधारित एस. वी. कॅन हा लघुपट साकारला  आहे.  https://youtu.be/27Fnfr0PKZ8
अशी याची लिंक आहे. या लघुपटाला पुणेसह चंदगड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सूर्यकांत अनेक वर्षांपासून नोकरीनिमित्त पुणे येथे आहे. सामाजिक कार्यकर्ता व एक कलाकार म्हणुन त्याची ओळख आहे. मुळात अभिनयाची आवड असल्यामुळे नोकरी करत तो आपली कला जोपासत आहे. डिसेंबर २०१२ मध्ये पुणे येथे झालेल्या पु. ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेत त्याला उत्कृष्ट अभिनयाच पारितोषिक मिळाल होत. तसेच अभिवाचन, एकांकिका, शॉर्ट फिल्म मध्ये काम करत तो अभिनयाची छाप पाडत आहे.
        कोरोना सारख्या महाभयानक संकटाशी आपण गेली अनेक महिने सामना करत आहोत. या काळात आपली अर्थव्यवस्था किती बिघडली आहे, किती मोठे नुकसान उद्योगधंद्यावर झाले आहे, याचा आपणाला अंदाज आहेच. म्हणुनच  कोरोना सारख्या महाभयानक संकटातून मुक्त झाल्यानंतर आपण आपली अर्थव्यवस्था कशी सुधारू शकतो ? एका वेगळ्या आणि सोप्या मार्गानी छोटे मोठे रोजगार, उद्योगधंदे कसे वाचवू शकतो ? यावर सूर्यकांत व त्याच्या पुण्यातील कलाकार मित्रांनी आप-आपल्या घरी बसूनच या लॉकडॉउन काळात "ए्स, वी कॅन !"  नावाची छोटीशी शॉर्ट फिल्म बनवली आहे. कथा, संकल्पना, संगीत नियोजन, दिग्दर्शन सर्व सचिन गायकवाड याचे असून यामधे सचिन गायकवाड, सूर्यकांत गुरव, दिनेश नेरुणे, अनिल गायकवाड, ऋषिकेश पुटगे, विक्रम राऊत, संतोष बोंबले व विषेश सहाय्य म्हणून कलर्स मराठी वरील महाराष्ट्रची हास्यजत्रा फेम गौरव मोरे या सर्वानी यात काम केलं आहे. या शॉर्ट फिल्म चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही शॉर्ट फिल्म संपूर्णता मोबाईल वर तयार केली गेली आहे, अगदी संपादन, कलर व्यवस्था आणि संगीत नियोजन सुद्धा. सध्या सोशल मिडियावर ही शॉर्ट फिल्म तुफान गाजत आहे. 

            आपला प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न देखील आपली अर्थव्यवस्था सुधारण्याला मदत करेल, त्यामुळे घाबरून न जाता या संकटाशी सामना करणे गरजेचे आहे.  याबाबत जाग्रुती व्हावी म्हणून आम्ही लघुपट बनवला आहे.
सूर्यकांत गुरव, नाट्य कलाकार, पुणे यांनी सांगितले. 

2 comments:

Post a Comment