अडकूर ठरतोय कोरोनाचा हॉट स्पॉट , ग्रामस्थांनी काळजी घेण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2020

अडकूर ठरतोय कोरोनाचा हॉट स्पॉट , ग्रामस्थांनी काळजी घेण्याची गरज

अडकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्याना सूचना देताना डॉ . बी .डी. सोमजाळ
अडकूर- सी .एल. वृत्तसेवा ( संजय पाटील )
चंदगड तालूक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकीक असणारे  अडकूर ( ता. चंदगड ) कोरोनाचा हॉट स्पॉट  बनले आहे.केवळ व्यापारी व ग्रामस्थांच्या चूकीचा फटका सर्वसामान्य  नागरिकांना व प्रशासनाला बसला आहे . येथे सापडलेल्या कारोना  बाधीत एका मृत रुग्णासह इतर सातही रुग्ण स्थानिक असल्याने प्रशासनाची
 डोकेदूखी वाढलीआहे .
                   गडहिंग्लज तालूक्याच्या सिमेनजीक असणाऱ्या अडकूरमध्ये सापडलेला पहिलाच  स्थानिक कोरोना रुग्ण मृत झाल्याने प्रचंड खळबळ उडाली . हा रुग्ण गावात तसेच बाजारपेठेत वावरल्याने याच्या संपर्कात आलेल्या सात जनांना कोरोनाची बाधा झाली . तसेच याच बाजारपेठेत वावरलेले मुगळी येथील तिघेजन कोरोना पॉझीटिव्ह झाले . त्यामूळे प्रशासनास या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्याना संस्थात्मक कॉरंटाईन करण्याबरोबरच स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यासाठी अहोरात्र काम करावे लागले . येथील कोरोना दक्षता समिती व ग्राम पंचायत अडकूर बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडली . कोणत्याही नियमांचे बंधन पाळता खुलेआम व्यापाऱ्यांचा व नागरिकांचा वावर बाजारपेठेत वाढला . तर काही ठराविक व्यापाऱ्यांचे हितसंबंध बघन्याच्या नादात लॉक डॉऊनचा  बट्याबोळ झाला . तसेच बाहेरून आलेल्यांचे कोरं टाईन करण्यावरून ही  दूजाभाव केला गेल्याची चर्चा परिसरात चालू आहे . तर अगदी दोन दिवसा पूर्वीच  संस्थात्मक विलगीकरण केलेल्या काहीनी विलगीकरण ठिकाणीच मटण पार्टी केल्याची चर्चाही आहे .त्याबरोबरच यापूर्वी अडकूर परिसरातील बोंजूर्डी , मोरेवाडी , सत्तेवाडी , सोनारवाडी , इब्राहिम पूर आदि गावामध्ये ३६ रुग्ण सापडले होते. याचा जराही बोध अडकूरकरांनी घेतला  . याची किंमत आता मोजावी लागत आहे . येथील प्रा .आ .केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ .बी.डी. सोमजाळ व इतर कर्मचारी वर्ग २४ तास कार्यरत असले तरी ग्रामस्थानिही  शासनाने दिलेल्या नियमांचे व सूचनांचे पालन करने गरजेचे आहे .सध्या मात्र  अडकूर सह मुगळी पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे . तसेच अजूनही या रुग्णांच्या संपर्कात नेसरी, चंदगड येथील काही व्यापारी आले असण्याची शक्यता आहे . त्यामूळे प्रशासन सतर्क  असले तरी ज्यांना काही त्रास जाणवत असेल त्यानी तात्काळ समोर येऊन आरोग्य केंद्रात दाखल होणे गरजेचे आहे . सध्या मात्र अडकूर कोरोनाचा हॉट स्पॉट बनू पहात आहे . हे मात्र निश्चित .

No comments:

Post a Comment