अडकूर येथे कोरोना दक्षता कमिटी लाॅकडाऊन संदर्भात चर्चा करताना.
अडकूर -सी .एल. वृत्तसेवा ( एस .के.पाटील )
चंदगड तालूक्यासह कोल्हापूर जिल्हयात सर्वाधिक स्थानिक कोरोना रुग्णांचा विळखा अडकूर बाजारपेठेला बसत चालला आहे . यामूळे येथील दक्षता कमिटीसह प्रशासन अधिक दक्ष झाले असून आज झालेल्या बैठकीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अडकूरला आठवड्यातच ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत . यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे . सर्व रुग्ण स्थानिक असून यापैकी काहींच्या संपर्कात आलेल्या मुगळी येथील तिघाना कोरोणाची बाधा झाली आहे .तर दोन्ही गावातील शंभरहून अधिकाना कोरं टाईन केले आहे . आज अडकूर ग्रामपंचायती समोर कोरोना दक्षता कमिटी अध्यक्ष व सदस्य , तंटामुक्त अध्यक्ष जगन्नाथ इंगवले , उपसरपंच अनिल कांबळे , अडकूर व मलगेवाडी ग्रामपंचायत सदस्य, तलाठी एम .बी. भाट , ग्रामसेवक श्रीकांत सोनार , पोलिस पाटील संजय गुरव आदिंच्या उपस्थित विविध निर्णय घेण्यात आले . अडकूर बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अडकूर येथे ठेवण्यात आलेला पोलिस बंदोबस्त |
तसेच दूध संस्था , बॅंका , शैक्षणिक संस्था सुद्धा बंदच राहणार आहेत . गावामध्ये बाहेरून कोणीही प्रवेश करू नये अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे . गावातील वॉर्ड क्र .४ व ५ कोरोना हॉट स्पॉट बनले असल्याने या ठिकाणी अत्यंत कडक लॉक डाऊन असणार आहे . ग्रामपंचायत वॉर्डनिहाय काही संयसेवकांची निवड करण्यात आली असून ग्रामस्थाना काही अत्यावश्यक वस्तूंची गरज भासल्यास त्या वस्तू संयसेवकानी पूरविण्याचा निर्णयही घेण्यात आला .कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे . आज सकाळी चंदगडचे पोलिस निरीक्षक अशोक सातपुते यानी अडकूरला भेट देवून बंदोबंस्तासंदर्भात कर्मच्याऱ्याना सूचना दिल्या. त्यामूळे अडकूरमध्ये केवळ अत्यावश्यक वहानांनाच प्रवेश दिला जात आहे . वैद्यकिय अधिकारी डॉ . बी.डी. सोमजाळ यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकिय पथक कार्यरत आहे .एकंदरित अडकूरला कोरोनाचा विळखा बसत असल्याने याच्यातून बाहेर पडण्यासाठी कोरोना दक्षता कमिटी , तंटामूक्त कमिटी व ग्राम पंचायत प्रयत्न करत आहे . सध्या तरी रुग्ण संख्या वाढत असल्याने ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत.
No comments:
Post a Comment