![]() |
चंदगडचे आमदार राजेश पाटील याना विविध मागण्यांचे निवेदन देताना युवराज पाटील , मारूती पाटील , नारायण माळी |
महावितरण कंपनीमध्ये विविध रिक्त पदांच्या जागेवर वर्षानुवर्ष हजारो विज कंत्राठी कामगार अत्यंत तटपूंज्या वेतनावर काम करत आहेत . सध्या महावितरणनमध्ये शासनाने मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार असल्याने या जागावर कंत्राटी कामगारांना कायम करुन घेण्यात यावे या मागणीचे निवेदन आमदार राजेश पाटील यांना महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ चंदगड च्या वतीने देण्यात आले .
आघाडी शासनाच्या काळात २०१४ साली समान काम समान वेतन कायदा मंजूर झाला . पण यानुसार वेतन न देता कमी वेतनावर या कंत्राटी कामगारा कडून काम करून घेतले जात आहे . जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे . सध्या महावितरणकडून ५००० हजार विद्युत सहाय्यक (लाईनमन ) तर २००० हजार सहायक यंत्र चालक ( सबस्टेशन ऑपरेटर ) च्या जागा भरण्यात येणार आहेत . या जागावर कंत्राटी कामगाराना कायम करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे . नाहीतर ७ जूलैपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे . महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे कोल्हापूर सर्कल अध्यक्ष युवराज सोनार , गडहिंग्लज डिव्हीजन अध्यक्ष नारायण माळी , उपाध्यक्ष नवीन चव्हाण , चंदगड सब डिव्हीजनचे अध्यक्ष मारुती पाटील , उपाध्यक्ष प्रविण चव्हाण राजेंद्र पाटील , भागोजी कांबळे आदिनी हे निवेदन आमदार राजेश पाटील याना दिले.
No comments:
Post a Comment