प्रा. बसवंत पाटील यांची राज्य प्रोफेशनल टिचर असोशिएशनच्या सदस्यपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2020

प्रा. बसवंत पाटील यांची राज्य प्रोफेशनल टिचर असोशिएशनच्या सदस्यपदी निवड

 प्रा . बसवंत पाटील
तेऊरवाडी -  सी .एल. वृत्तसेवा 
          चिंचणे ( ता. चंदगड ) येथील प्रा . बसवंत पाटील यांची प्रोफेशनल टिचर असोशिएशन महाराष्ट्र राज्याच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आहे .
          परभणी येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत कोल्हापूर डिस्ट्रीक्ट फ्रोफेशनल टिचर असोशिएशनची राज्य संलग्नता मान्य करणारा ठराव एकमताने संमत करून या संघटनेचे संचालक प्रा . बसवंत पाटील यांची राज्य कोअर कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली . प्रा . पाटील हे गैराई फौंडेशन कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष तर अखिल भारतीय  आदिवासी कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष आहेत . राज्य अध्यक्ष  प्रा .आर.बी. जाधव यानी निवडीचे पत्र प्रा . पाटील याना पाठवले असून  याकामी जिल्हा अध्यक्ष प्रा .बी.एस. पाटील , कार्याध्यक्ष एस .एम. पाटील , सल्लागार प्रा .तानाजी चव्हाण , प्रा . शहाजी पाटील, प्रा . सुरेश कातवरे आदिंचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment