वीज बीले माफ करा, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलची उर्जामंत्री नितीन राऊत यांचे कडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2020

वीज बीले माफ करा, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलची उर्जामंत्री नितीन राऊत यांचे कडे मागणी

वीज बिले माफ करा, या मागणीचे निवेदन देताना राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे कार्यकर्ते.
चंदगड / प्रतिनिधी
            कोव्हीड -१ ९ या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगात थैमान घातला आहे . यामुळे मार्च पासून देशात पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे.
           तीन महिन्यांचे भरमसाठ वीजबील एकदम देणेत आल्याने जनता हवालदील झाली आहे . कष्ट करून मुलाबाळांचे जीव वाचवायचे कि वीजबील भरायचे या द्विधा मनस्थितीत जनता हैरान झाली आहे . यामुळे सदरील वीजबीले भरणे अडचणीचे होणार आहे,त्यामुळे कोरोना कालावधीतील वीज बील माफ करावीत अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन उर्जा मंत्री नितीन राऊत याना देण्यात आले आहे. 
           कोरोनाच्या संसर्गाने हजारो रूग्ण बाधीत आहेत तसेच शेकडो रूग्ण बळी जात आहेत,अशा भयंकर जीवघेण्या संकटाच्या वेळी  महाराष्ट्रातील जनतेने शासनाला पुर्णपणे सहकार्य केलेले आहे त्यात व्यापारी , कर्मचारी , शेतमजूर , रोजंदारी कामगार कारखानदार तसेच सर्व जनतेचे महत्त्वाचे योगदान दिलेले आहे . व्यवसाय बंद असलेने कर्मचारी , शेतमजूर , रोजंदारी कामगार यांचेवर उपासमारीची वेळ आली होती . अशा परिस्थितीत मागील तीन महिन्यांचे भरमसाठ वीजबील एकदम देणेत आले जनता हवालदील झाली आहे .यामुळे ही वीजबीले भरणे अडचणीचे होणार आहे .त्यामुळे शासनाने हि वीज बिले माफ करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  निवेदनावर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तजमूल फनीबंद,अनिल भाग्यवंत,बाळू रजपूत, सत्यभामा दळवी, बशीवर सय्यद,शंकर फाथरवट,बशीर नाईकवाडी, फातिमाबी शहा,झाकीर शहा ,बशीर नेसरीकर, झूबेर मुल्ला,सलीम नेसरीकर, जावेद शेरखान,ईस्माईल नाईकवाडी, पियेदाद डिसूझा, विवेक सबनीस,आब्बासअली नाईक, आदीसह नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.

No comments:

Post a Comment