![]() |
कुर्तनवाडी येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम मान्यवर. |
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथे एक जुलै ते सात जुलै कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना कृषी विषयक योजनांची माहिती देण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, सभापती ॲड. अनंत कांबळे, उपसभापती सौ. मनिषा शिवनगेकर, पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी संतोष जाधव, मंडल कृषी अधिकारी युवराज पाटील, कृषी सहाय्यक अतुल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी तानाजी चांदेकर, पंकज पाटील, म्हातारु चांदेकर, मष्णु चांदेकर, सुभाष गावडे, यशवंत चांदेकर, भिमराव चांदेकर, विष्णु काजिर्णेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment