तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
सध्या कोरोनाचा वाढता प्रसार व लॉक डॉऊन पहाता विवाह बंधनात अडकून पाहणाऱ्या तरुण तरुणींची मोठी पंचाईत झाली आहे .पण अशा वातावरणातही अडकूर परिसरातील गणूचीवाडी येथील युवकाने आपल्या लग्नाची आमंत्रण पत्रिका आगळी - वेगळी बनवल्याने चंदगड तालूक्यात त्या व्हायरल पत्रिकेची चर्चा चालू आहे.
लग्न पत्रिका म्हटले की पै-पाहुणे, मित्रमंडळी याना आग्रहाचे लग्नाला येण्याचे निमंत्रण असते. पण येथे उलटेच आहे . गणूचीवाडी येथील युवक चि .किरण भादवणकर याचा विवाह केंचेवाडी येथील चि. सौ. का. राजश्री हिचेबरोबर रविवार दि १४ जून रोजी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे . पण या लग्नाच्या पत्रीकेत लग्नाला न येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. याबरोबरच या शुभ कार्यात सहकुटुंब सहपरिवार न येऊन आपल्या घरी राहून आम्हाला शुभाशिर्वाद देण्याचे आवाहन केले आहे . तसेच घरी रहा सुरक्षित रहा व सरकारला सहकार्य करा,लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामूळे या लग्नाच्या आमत्रंणाची जोरदार चर्चा चंदगड तालूक्यात चालू आहे.
No comments:
Post a Comment