सोमवार (ता. 15) पासून सदर ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र
कागणी / सी. एल. वृत्तसेवा
सदर जमिनीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी भेट दिली असता असे आढळून आले आहे की संबंधित ठिकाणची जमीन ही दीडशे ते दोनशे फूट खचली असून 3 फूट पर्यंत जमिनीमध्ये दबली आहे.या ठिकाणी शेतकऱ्यांना गुरांना वैरण आणण्यासाठी ये जा करावे लागत असल्या कारणाने सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित जमीन प्रतीबंधीत क्षेत्र म्हणून घोशीत करत आहे.त्याबरोबरच सदर जमिनिची पाहणी करण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात येणार असून प्रशासन शक्य तितक्या लवकर हा प्रश्न सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे - विनोद रणावरे,तहसीलदार,चंदगड
खचलेल्या जमिनीची पाहणी करताना तहसीलदार विनोद रणावरे,तालुका कृषि अधिकारी किरण पाटील व इतर
|
कोवाड येथील ताम्रपर्णी नदीकाठावरील खचलेल्या जमिनीची बातमी व व्हीडिओ सी एल न्युज ने काल प्रसारित केली होती.याची दखल घेऊन तात्काळ आज सकाळी चंदगड चे तहसीलदार विनोद रणावरे व तालुका कृषि अधिकारी किरण पाटील यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व वळीव पावसाच्या तडाख्यामध्ये कोवाड येथील तांबाळ नावाच्या शेतातील ताम्रपर्णी नदीकाठावरील जमिन दीडशे ते दोनशे फूट खचून संबधीत शेतजमिनीला धोका निर्माण झाला आहे.या जमिनीत झाड़े,विद्युत वाहिनीच्या तारा,पोल तसेच संबंधित शेतकऱ्याच्या कृषि पंपाबरोबरच पेट्याचेही नुकसान झालेले आहे.या जमिनीवरून उच्च दाबाची विद्युत वहिनी गेली असून या प्रकारामुळे विद्युत पोल कलंडले आहेत.त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने सदर ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
या जमिनीवर संबंधित शेतकऱ्याना गुरांना वैरण आणन्यासाठी जावे लागत असल्या कारणाने शेतकऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार करून सदर क्षेत्र हे सोमवार पासून प्रवेश करण्यास प्रतिबंधित करण्यात आले असून शेतकऱ्यानी या जागेवरून ये जा करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी तहसीलदार विनोद रणावरे, तालुका कृषि अधिकारी किरण पाटील,कोवाड बीट चे मंडल अधिकारी आप्पासो जिनराळे,तलाठी दीपक कांबळे,कृषि सहायक एस. डी.मुळे, कृषि सेवक अतुल मुळे,कृषि सेवक बी.आर.गवाळे आणि जोतिबा चुडाप्पा वांद्रे,धोंडिबा आडाव,संदीप तारिहाळकर,दशरथ साळुंखे,प्रमोद वांद्रे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment