झांबरे ते न्हावेली रस्त्यातील खड्डे तरुणांनी भरले श्रमदानातून, प्रवास होतोय सुकर - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2020

झांबरे ते न्हावेली रस्त्यातील खड्डे तरुणांनी भरले श्रमदानातून, प्रवास होतोय सुकर

चंदगड / प्रतिनिधी
      चंदगड तालुक्यातील झांबरे न्हावेली रोडवरील खड्याची दुर्दशा झाली होती. अनेक तक्रारी केल्या पण याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने ,शहरातील मंडळी गावाकडे आल्याने गावातील प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून न्हावेली गावातील तरुणांनी एकत्र येऊन श्रमदानातून तीन ट्रॅक्टर ट्रॉली भरून दगड टाकून खड्डे भरून काढल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे सुकर झालेचे स्थनिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच आण्णा प्रेमी ग्रुपमधील तरुणांचे कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment