![]() |
चंदगड तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी मान्यवर. |
हलकर्णी (ता. चंदगड ) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतीक रक्तदान दिनाच्या निमित्ताने चंदगड तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी 110 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे नियोजन भाजप युवा मोर्चाचे आयोजकांनी केले होते. सांगली येथील मानस ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकारीणी सदस्य गोपाळराव पाटील, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन मुगेरी, उपाध्यक्ष संदीप नांदवडेकर, सुनिल काणेकर, गोविंद पाटील, विशाल पाटील चेतन बांदिवडेकर आदी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment