![]() |
महिपाळगड येथील डॉ. संजय भोसले यांनी गावामध्ये आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप केले. |
मुळ गाव महिपाळगड (ता. चंदगड) पण सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. संजय भोसले यांनी सामाजिक बांधिलकी व आपुलकीच्या नात्याने आपल्या महिपाळगड गावातील संपूर्ण कुटुंबाला आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप केले.
महीपाळगड ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश भोसले यांच्या सहकार्याने औषध वितरण कार्यक्रम व औषध खाण्याची पद्धत याच्या माहिती पत्रकाचे वितरण करण्यात आले. कोरोनाव्हायरस वर लस उपलब्ध नसल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध एकमेव प्रतिबंधक उपाय असल्याचे मत सरपंच रमेश भोसले यांनी व्यक्त केले.तसेच डॉक्टर संजय भोसले यांच्या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले
औषध वितरण कार्यक्रमाला सरपंच रमेश भोसले ग्रामसेवक श्री. वारी, विठ्ठल भोसले, सुनील सावंत, सुरेश भोसले, वैजनाथ कदम व ग्रामस्थ उपस्थित होते औषध वितरण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment