तेऊरवाडी येथे एकता फौन्डेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार. |
तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील एकता फौंन्डेशनच्या वतीने कोविड-१९ साठी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्यानी रक्तदान केले.
सर्व प्रकारचे शोशल डिस्टंन्सींग राखत रक्तदान शिबिर घेतले गेले. सुरवातीला सरपंचा श्रीमती सुगंधा कुंभार यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. तर तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश दळवी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तर फौंन्डेशनचे अध्यक्ष दयानंद पाटील, उपा अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपसरपंच सौ. शालन पाटील, सदस्य राजेंद्र भिंगुडे, बजरंग पाटील, सुनिल पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले . यावेळी दयानंद पाटील, राजेंद्र भिंगुडे, बी.टी पाटील, बजरंग पाटील यानी मनोगते व्यक्त केली. सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असणाऱ्या एकता फौन्डेशनने कोरोना काळात मोफत वैद्यकिय तपासणी, गोळ्या वाटप, आदि उपक्रम घेऊन समाजकार्यात अग्रेसर असणारे फौंन्डेशन कौतुकास पात्र असल्याचे मनोगत राजेंद्र भिंगुडे यानी व्यक्त केले. तर रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असल्याने युवकानी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन बजरंग पाटील यानी केले. यावेळी माजी सैनिक जानबा पाटील , फौंन्डेशनचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, आण्णासाहेब गळतगे ब्लड बँक गडहिंग्लजचे कर्मचारी उपस्थित होते. आभार संभाजी पाटील यानी मानले.
No comments:
Post a Comment